PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024   

PostImage

महिला स्वतःच्या इच्छेने वेगळी राहात असेल तर तिला तिच्या पतीकडून …


 

जबलपूर, : जर एखादी महिला स्वतःच्या इच्छेने वेगळी राहात असेल तर तिला तिच्या पतीकडून देखभाल भत्ता घेण्याचा अधिकार नाही, असे जबलपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. असे म्हणत न्यायालयाने पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेची याचिका फेटाळून लावली.

 न्यायालयाने म्हटले की, महिलेने स्वतःच तिच्या पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला असल्याने तिला भरणपोषण मागण्याचा अधिकार नाही. कोर्टात महिलेच्या अर्जावर सुनावणी सुरू असताना तिच्या पतीने सांगितले की, दोघेही 15 डिसेंबर 2020 पासून वेगळे झाले आहेत. पतीने सांगितले की, त्यावेळी पत्नी स्वतः विभक्त झाली होती. त्यानंतर पतीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १ अंतर्गत मिळालेले वैवाहिक हक्क बहाल करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024   

PostImage

जाणार होते हनिमूनला, नेले अयोध्येला; मागितला घटस्फोट


भोपाळ : हनिमूनसाठी गोव्याला नेण्याचे आश्वासन देऊन अयोध्येला नेल्यामुळे एका महिलेने चक्क घटस्फोटासाठी अर्ज केल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये समोर आला आहे.

 

महिलेने घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयात सादर केला असून, येथे या जोडप्याचे समुपदेशन करण्यात येत आहे.

 

काउंसिलर शैल अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोघांचे लग्न झाले होते. पत्नीला हनिमूनसाठी परदेशात नेण्याचे आश्वासन त्याने दिले होते. मात्र त्याच्या वृद्ध आई-वडिलांना मंदिरात जाण्याची इच्छा असल्याने त्यांनी घरगुती धार्मिक स्थळाला भेट द्यावी, असा आग्रह धरला. अखेर याजोडप्याने हनिमूनसाठी गोव्याला जायचे मान्य केले.

 

महिलेने आरोप केला की, हनिमूनला जाण्यासाठीची सर्व तयारी झाली होती. मात्र पतीने प्रवासाच्या एक दिवस आधी आपण आईच्या इच्छेनुसार अयोध्या आणि वाराणसीला जात आहेत, असे सांगितले होते.

विश्वास तोडला

महिलेने अखेर त्याच्यासोबत अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र माघारी परतल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यामुळे महिलेने थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, पतीने विश्वास तोडल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023   

PostImage

इंग्रजी येत नसल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनीचे केसच उपटले


 

मध्य प्रदेशाच्या बैतूल जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला इंग्रजी येत नसल्यामुळे मारहाण करून तिचे केसच उपटून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. पोलिस उपअधीक्षकांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे आमला ब्लॉकमधील खेडली बाजार प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनीला पूर्णिमा साहू या शिक्षिकेने १५ डिसेंबर रोजी मारहाण करून तिचे केस बाहेर उपटले. 

 

शाळेतील इतर विद्यार्थिनींनीही शिक्षिका मारहाण करत असल्याची तक्रार केल्याचे मुलीचे वडील उमेश बामणे यांनी सांगितले. केस उपटल्यामुळे सध्या मुलीचे डोके दुखत आहे. मुलीचे केस ज्याप्रकारे उपटले गेले, ही गंभीर घटना आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे डीसीपी संजय श्रीवास्तव यांनी सांगितले,